Description
या ग्रंथात प्रारंभी संज्ञांचे अर्थ देऊन त्यासंबंधीची अनेक मते दिली आहेत. लोकसाहित्य समाजजीवनात का प्रचलित राहते हे सांगून समाजजीवनातील त्याची अर्थपूर्णता स्पष्ट केली आहे. लोकसाहित्याच्या प्रमुख अभ्यासपद्धती, त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात कोणत्या पद्धतींनी अभ्यास केला जातो यासंबंधीचा ऊहापोह करून लोकसाहित्याचे संकलन कसे करावे याविषयी विवेचन केले आहे. लोकवाङ्मयाच्या प्रकारांची प्रमुख लक्षणे सांगून शेवटी परंपरेने चालत आलेले मौखिक वाङ्मय आणि व्यक्तिनिर्मित ललित वाङ्मय यांतील साम्यभेदांची चर्चा करण्यात आली आहे. दोहोंच्या परस्परसंबंधांनाही स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिनिर्मित ललित वाङ्मयात लोकतत्त्व अनिवार्यपणे येत असल्यामुळे वाङ्मयकृतींचा लोकतत्त्वीय अभ्यास करण्याची गरज प्रतिपादन केली आहे. लोकसाहित्यशास्त्राचा परिचय करवून देताना पाश्चात्य तसेच भारतीय ग्रंथकारांच्या ग्रंथांचे साहाय्य घेतले आहे. या ग्रंथकारांच्या मतांचा मागोवा घेत घेत लोकसाहित्यविषयक विविध प्रश्नांची चर्चा केली आहे.
Godavari Prakashan ; Pages : 348 ; Marathi


Reviews
There are no reviews yet.