इस्लामचे अंतरंग ( मराठी )

इस्लामचे विविध पैलू आणि विविध विषयांबाबत इस्लामचा दृष्टिकोन प्रस्तुत ग्रंथात दिले आहेत. इस्लामची मूलतत्वे, कुराण व अल्-हदीस हे इस्लामचे मूलाधार व शरियत यांची माहिती ग्रंथाच्या पहिल्या भागात दिलेली आहे. मुस्लिमांमधील विविध पंथोपपंथांची माहिती दुसऱ्या भागात दिलेली आहे. स्त्री, विवाह, संततीनियमन, काफिर, जिहाद, पिम्मी, वक्फ आणि धर्मत्याग या आठ विषयांबाबत इस्लामची भूमिका तिसऱ्या भागात विशद केलेली आहे.

250.00

1 in stock

Compare

Description

इस्लामचे अंतरंग
इस्लाम गेली तेराशे वर्षे भारतात आहे. या देशात हिंदू-मुस्लिम प्रदीर्घ काळ राहत असूनही इस्लामविषयी हिंदू समाजात पोर अज्ञान आहे. मुस्लिम मानस आणि व्यवहार यांच्यावर इस्लामी तत्वज्ञानाचा पगडा आहे. त्यामुळे इस्लामचे अंतरंग समजल्याशिवाय मुस्लिमांच्या व्यवहाराची संगती लागणे अशक्य असते. इस्लामी धर्मशास्त्र व न्यायशास्त्र यांच्या अभ्यासाला व्यावहारिक महत्व आहे. इस्लाम ही सर्वव्यापी जीवनप्रणाली असून जीवनाच्या अक्षरश: प्रत्येक अंगाबाबत इस्लामची विशिष्ट भूमिका आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक, लौकिक आणि पारलौकिक असा भेद इस्लाम करीत नाही.
इस्लामचे विविध पैलू आणि विविध विषयांबाबत इस्लामचा दृष्टिकोन प्रस्तुत ग्रंथात दिले आहेत. इस्लामची मूलतत्वे, कुराण व अल्-हदीस हे इस्लामचे मूलाधार व शरियत यांची माहिती ग्रंथाच्या पहिल्या भागात दिलेली आहे. मुस्लिमांमधील विविध पंथोपपंथांची माहिती दुसऱ्या भागात दिलेली आहे. स्त्री, विवाह, संततीनियमन, काफिर, जिहाद, पिम्मी, वक्फ आणि धर्मत्याग या आठ विषयांबाबत इस्लामची भूमिका तिसऱ्या भागात विशद केलेली आहे.
सत्यान्वेषणाच्या भूमिकेतून इस्लामची वस्तुनिष्ठ माहिती देणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. इस्लामचे संदर्भसाहित्य, मध्ययुगीन आणि अर्वाचीन मुस्लिम, हिंदू वा पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आधार या ग्रंथात घेतलेला आहे. ऐतिहासिक संदर्भाबरोबरच ठिकठिकाणी समकालीन उदाहरणे दिल्यामुळे ग्रंथात केलेल्या विवेचनाना वर्तमानाशी संबंध आहे.

Author

Shreerang Godbole

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Select at least 2 products
to compare