Description
जागतिक व्यवस्था ही कायम उत्क्रांत होत असते आणि त्याअर्थाने बदलाला एक स्थिर घटक मानता येईल, पण कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारीचा परिणाम, अफगाणिस्तानमधील घडामोडी, युक्रेन संघर्ष आणि प्रमुख शक्तींमधील गंभीर संघर्ष ह्यामुळे ह्या उत्क्रांतीला एक तीक्ष्ण धार दिली
गेली आहे. ‘एक बदल आणि चार हावरे’ एक नवे चित्र निर्माण करत आहे. आपापल्या परीने ह्या ‘चार धक्क्यांनी’ जागतिक चिंता आणि असुरक्षिततेमध्ये विविध प्रकारांनी भर टाकली आहे. प्रचंड उलथापालथीच्या ह्या काळात अपरिहार्यपणे जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यातून एक
अग्रगण्य जागतिक नेतृत्व बनण्याच्या मार्गावर भारत अग्रेसर होत आहे.
‘भारत मार्ग’ ह्या पुस्तकात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ह्या आव्हानांचे विश्लेषण करतात आणि संभाव्य धोरण प्रतिसाद स्पष्ट करतात. हे करताना ते भारताचे राष्ट्रीय हित आणि आंतरराष्ट्रीय जबाबदान्या ह्यांचे संतुलन साधण्याविषयी अतिशय जागरूक आहेत. जागतिक व्यासपीठावर आपले स्थान पुन्हा प्रस्थापित करू इच्छिणान्या सांस्कृतिक सत्तेसाठी ते आपले विचार इतिहास आणि परंपरेच्या संदर्भाने मांडतात
Author : S Jaishankar ; Publisher : Bhavisa ; PaperBack ; Pages : 262 ; Translator : Sarita Athavale


Reviews
There are no reviews yet.